जिद्दीला सलाम...: पुन्हा उभारला मृगगडावरील माहिती फलक

अमित गवळे
रविवार, 11 मार्च 2018

फलकांची तोडफोड झाल्यावर दुर्गवीरांनी एक निश्चय केला होता की हा फलक परत उभारायचाच ! या गडांसाठी चांगल ते सर्व करण्याचा संकल्प अर्धवट सोडणार नाही हे नक्की केले असल्याचे, दुर्गवीर च्या सदस्यांनी सकाळला सांगितले

पाली - सुधागड तालुक्यातील भेलीव येथील मृगगडावरील माहिती फलक काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी तोडला होता. दुर्गवीरच्या शिलेदारांनी अतिशय मेहनत आणि जिद्दीने पुन्हा हा अवजड माहिती फलक उभा केला आहे.

फलक तोडल्याची बातमी सर्व प्रथम सकाळने दिली होती. रंगाचा बेरंग करणाऱ्या वाईट वृत्तीला होळीत टाकून तो फलक पुन्हा बनवून उभारला गेला. तोडलेला फलक पुन्हा खाली नेऊन त्यासाठी परत वेगळे रॅाड तयार करुन ते रॅाड पुन्हा गडावर आणले. यासाठी पुन्हा तेवढीच मेहनत दुर्गवीरांना घ्यावी लागली.

आपला अमूल्य वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून हे दुर्गवीर सणासुदिचे गडावर फलक उभारत होते. या मोहिमेत रामदास घाडी, अर्जुन दळवी, सुरज चव्हाण, प्रथमेश बेचावडे, समीर शिंदे, धिरज लोके हे दुर्गवीर मुंबईहुन प्रवास करुन मृगगड च्या पायथ्याशी नव्याने बनविलेले फलकाचे रॅाड घेवुन गडावर गेले. या फलकांचे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी २-३ हजारांचा खर्च झाला. या बरोबरच तो जड रॅाड अवजड जागेतुन गडावर वाहुन नेण्याचे काम या दुर्गवीरांनी केले. 

फलकांची तोडफोड झाल्यावर दुर्गवीरांनी एक निश्चय केला होता की हा फलक परत उभारायचाच ! या गडांसाठी चांगल ते सर्व करण्याचा संकल्प अर्धवट सोडणार नाही हे नक्की केले असल्याचे, दुर्गवीर च्या सदस्यांनी सकाळला सांगितले.

काही दिवसांपुर्वी मृगगडवरील माहिती फलक तोडला होता. दुर्गवीरच्या सदस्यांनी अथक परिश्रमाने तो पुन्हा नव्याने बसविला आहे. खर तर हा एक संदेश आहे त्यांना जे अशी वाईट कृत्य करतात... "तुम्ही कितीही वाईट करा आम्ही फक्त चांगलच करणार कारण आम्हाला विश्वास आहे तुम्हालाही एक दिवस चांगल करावंस वाटेल....."
- संतोष हसुरकर, अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान

Web Title: lpnkan news fort development