वारुळाला गांडूळाने डिवचले तर मुंग्या त्याचा फडशा पाडतात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

दाभोळ - मुंग्या एकत्र आल्या की त्यांचे वारुळ बनते आणि या वारुळाला एखाद्या गांडुळाने जर डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुंग्या फडशा पाडल्याशिवाय गप्प बसत नाहीत, अशी टीका नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले मधुकर दळवी यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर केली.

दाभोळ - मुंग्या एकत्र आल्या की त्यांचे वारुळ बनते आणि या वारुळाला एखाद्या गांडुळाने जर डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मुंग्या फडशा पाडल्याशिवाय गप्प बसत नाहीत, अशी टीका नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले मधुकर दळवी यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर केली.

मधुकर दळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सूर्यकांत दळवी यांनी दळवी हे माझे नातलग नसून केवळ आडनाव बंधू असल्याचे सांगितले होते. वेळवीची मुंगी जरी रामदास सेनेत गेली तरी तिला महत्त्व प्राप्त होते असे विधान केले होते.

या विधानाचा समाचार मधुकर दळवी यांनी सोवली (ता. मंडणगड) येथे सभेत घेतला. वेळवीची मुंगी जरी रामदास सेनेत गेली तरी तिचा उदो उदो होतो यावर बोलताना मधुकर दळवी म्हणाले, ‘सर्व मुंग्या मिळून वारुळ तयार होते आणि या मुंग्यांजवळ एखादे गांडूळ आले आणि त्याने वारुळाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फडशा उडवतात.’

आम्ही आजपर्यंत सूर्यकांत दळवींना भावाप्रमाणेच वागवत आलो आहोत, मात्र माझ्या शिवसेना प्रवेशाने त्यांच्या पोटात का दुखू लागले आहे. निसर्ग काही नियम बदलत नसतो, वेळवीचे दळवी आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे नाते सर्वांनाच माहिती आहे. 

वेगवेगळी विधान करून राहतात चर्चेत
२०१४ मध्ये त्यांचा झालेला पराभव अजूनही पचनी न पडल्याने ते गेले काही महिने सातत्याने वेगवेगळी विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दळवी यांनी सांगितले. १९९० रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान येथील जनता त्यांना ओळखत नव्हती. मधुकर दळवींचा भाऊ म्हणून त्यांना त्यावेळी मतदान झाले होते, हे ते आज विसरले असल्याचा टोलाही दळवींना लगावला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhukar Dalavi comment