सभापती मधुकर दळवींचा राजीनामा

सभापती मधुकर दळवींचा राजीनामा

रत्नागिरी - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर दळवी यांनी आज तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यांची वर्षाची मुदत संपून ३ महिने झाले, तरी राजीनामा देण्यास टाळाटाळ होत होती. डॉ. तानाजी चोरगे, बाबाजी जाधव यांनी डोस दिल्यानंतर आज राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. 

उपसभापती यांनीही यापूर्वीच राजीनामा दिला आहे. सहकार क्षेत्रामध्ये नाव असलेल्या डॉ. तानाजी चोरगे यांनी बाजार समितीवर वचक ठेवला आहे. त्यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय सहकार पॅनेलच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढविण्यात आली. या पॅनेलमध्ये शिवसेनेसह सर्वपक्षाचे संचालक आहेत. त्यानुसार पहिल्या वर्षाची टर्म उदय सामंत यांच्या मर्जीतले गजानन पाटील यांना देण्यात आली होती.

श्री. पाटील यांनी सेसच्या माध्यमातून बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगले काम केले. सर्वपक्षाच्या वाट्याला सभापतिपद यावे यासाठी प्रत्येकाला वर्षाची मुदत देण्यात आली होती. गजानन पाटील यांची मुदत संपल्यानंतर मधुकर दळवी यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी नियुक्ती केली. श्री. दळवी यांनी शेतकऱ्यांना आंबा हंगामात थेट उत्पन्न मिळावे, यासाठी ठिकठिकाणी आंबा महोत्सव भरविण्यात पुढाकार घेतला. महामार्गावर स्टॉल लावले. 

 संचालकांचा दुजोरा
एका वर्षासाठी दळवी यांची नियुक्ती केली होती. त्यांची मुदत संपून ३ महिने झाले तरी त्यांनी राजीनामा दिला नाही. सर्व संचालक मंडळांनी नाराजी व्यक्त करीत डॉ. चोरगे आणि श्री. जाधव यांच्याकडे कैफियत मांडली. अखेर श्री. चोरगे यांनी योग्य डोस दिल्यानंतर श्री. दळवी यांनी आज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तडकाफडकी राजीनामा दिला. काही संचालकांनी याला दुजोरा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com