मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

महाड - गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर होणारी कोंडी कमी करण्यासाठी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीतून दूध, पेट्रोल व डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, भाजीपाला आदी जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर महामार्गाचे रुंदीकरण व रस्तादुरुस्तीसाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही; मात्र या वाहतूकदारांनी वाहतूक विभाग वा महामार्ग पोलिसांकडून प्रवेशपत्र घ्यावे, असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Web Title: mahad konkan news heavy vehicle ban on mumbai-goa highway