४१४ पोलिसांना पसंतीची बदली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

महाड - रायगड जिल्ह्यात ज्या पोलिस कर्मचाऱ्यांचा नेमणुकीच्या ठिकाणी कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांची पसंतीच्या ठिकाणी बदली करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी घेतला. त्यानुसार ४१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

अधीक्षकांच्या या निर्णयाला अनुसरून बदलीपात्र पोलिस कर्मचाऱ्यांच्या २३ मे रोजी अलिबाग येथील पोलिस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहामध्ये मुलाखती घेण्यात आल्या. १९ सहायक फौजदार, ४७ पोलिस हवालदार, ८३ पोलिस नाईक, २४६ पोलिस शिपाई; तसेच १९ चालक अशा ४१४ कर्मचाऱ्यांच्या पसंतीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. ठाणे तसेच शाखानिहाय उपलब्ध; तसेच रिक्त जागांचा विचार करून पारस्कर यांनी या बदल्या केल्या आहेत. पोलिसांना तणावमुक्त वातावरणात कामकाज करता यावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. पसंतीच्या ठिकाणी बदली मिळाल्याने कर्मचारीही समाधानी आहेत.

Web Title: mahad news police