Nitesh Rane announces Cobia fish farming project
esakal
ओरोस : समुद्रातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत खोल समुद्रात ‘मसल फार्मिंग’ तसेच केजिंगच्या (जाळे) माध्यमातून कोबिया प्रजातीच्या माशांचे संवर्धन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करावा. मात्र, स्थानिक मच्छीमारांचा गैरसमज होऊ नये, यासाठी त्यांना विश्वासात घेण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिले.