How to Check Traffic E-Challan Online
esakal
चिपळूण : सिग्नल तोडणे, लेनची शिस्त न पाळणे, रस्त्यावरील सुरक्षाचिन्हांचे उल्लंघन करणे यांसारख्या किरकोळ वाहतूक नियमभंगांसाठी वाहनचालकांना वारंवार न्यायालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी होणार (Maharashtra traffic police e-challan rules) आहे. तडजोडयोग्य स्वरूपाच्या वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये ई-चलन अथवा निर्धारित दंड भरून प्रकरण निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होणार आहे.