Goa ACB Raid Excise Checkposts : महाराष्ट्र-गोवा सीमा तपासणी नाक्यांवर एसीबीची धडक कारवाई; चेकपोस्टवर सापडली बेकायदा रोकड, 10 कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात

ACB Raids at Patradevi and Mole Excise Checkposts : महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी आणि मोले येथील अबकारी तपासणी नाक्यांवर एसीबीने छापे टाकून १३ हजार ७० रुपयांची रोकड जप्त केली. दहा जणांना चौकशीसाठी पणजी कार्यालयात बोलावले आहे.
Patradevi excise checkpost ACB raid

Patradevi excise checkpost ACB raid

esakal

Updated on: 

बांदा : महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पत्रादेवी आणि मोले (गोवा) येथील अबकारी खात्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज छापे टाकून कारवाई केली. दोन्ही नाक्यांवरून एकूण १३ हजार ७० रुपये बेकायदा रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी नाक्यावर सेवेत असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी एसीबीच्या अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली. ही रक्कम कोणत्या कारणासाठी ठेवली होती, याबाबत तपास केला जात आहे. यासंदर्भात एसीबीने अधिक चौकशीसाठी उद्या (ता.२८) दहा जणांना चौकशीसाठी पणजी कार्यालयात बोलावले आहे. अचानक झालेल्या कारवाईने सर्वांचे धाबे दणाणले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com