मत्स्यव्यवसायांसाठी खुशखबर बजेटमध्ये मोठी घोषणा....

maharashtra government budget 2020 kokan marathi news
maharashtra government budget 2020 kokan marathi news

मालवण (सिंधुदुर्ग ) : राज्याच्या अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायासाठी भरीव निधी तरतुद केली आहे. यामुळे येत्या काळात मच्छीमारांना न्याय देता येईल असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केले. 
अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत बोलत होते. ते म्हणाले,''राज्यात निमखारे पाणी क्षेत्रात  कोळंबी उत्पादनास चालना देण्याची आवश्यकता आहे. कोळंबी प्रकल्पांसाठी शासकीय खाजण जमीन देण्याच्या सध्याच्या धोरणात बदल प्रस्तावित आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना कोळंबीउत्पादनासाठी शासकीय खाजण जमीन सुलभरित्या उपलब्ध होईल, अशा पद्धतीने त्यात बदल करण्याचा शासनाचा विचार आहे.

पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन

सागरी, निम खारे पाणी आणि पिंजरा पध्दतीने गोड्या पाण्यात करावयाच्या मत्स्योत्पादनास चालना मिळावी, यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतील जास्तीत जास्त निधी राज्यास उपलब्ध व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहन' या तत्त्वावर स्वतंत्र योजना सुरू करण्यात येईल. "

 ते म्हणाले "राज्यातील रेशीम उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत ' तुतीची लागवड' ही बाब समाविष्ट करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. 
रेशीम कीटक संगोपनगृहाकरिता तसेच रुपये १ कोटी पर्यंतच्या रेशीम धागा मशिनरीकरिता अनुदान देण्यात येईल."

वीजेच्या अनुदानात ७५ पैसे वाढ

ते पुढे म्हणाले "२७ अश्वशक्तीवरील यंत्रमाग धारकांना मिळणाऱ्या प्रतियुनिट वीजेच्या अनुदानात आणखी ७५ पैसे वाढ करून ते एकूण अनुदान रुपये ४.१५ प्रती युनिट करण्यात येईल.सहकार, पणन व वस्त्रोद्योग या विभागास रुपये ७ हजार ९९५ कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे.सागरमाला कार्यक्रमांतर्गत प्रवासी जलवाहतुकीसाठी तसेच पर्यटनाकरिता काम रेडिओ क्लब, कुलाबा येथे जेट्टीच्या बांधकामाकरिता सन २०२०-२१ मध्ये सारी ५० कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे."

जेट्टी बांधकामासाठी ६५ कोटी

 "सागरमाला कार्यक्रमातंर्गत किनारपट्टीवरील बंदरे मध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी वसई, भाईदर, खारवाडेश्वरी, मनोरी, घोडबंदर, नारंगी, मालवण, बोरीवली, गोराई व आंबडवे येथे रो-रो सेवेसाठी जेट्टी बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून या कामाकरिता सन २०२०-२१ मध्ये रुपये ६५ कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे.सन २०२०-२१ या वर्षात बंदरे विकास या विभागास कार्यक्रमावरील बाबीकरिता रुपये २७६ कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित आहे."

वरळी दुग्धलयाच्या १४ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन दुग्धशाळेच्या संकुलाची निर्मिती करण्यात येईल. या प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील पर्यटन जागेत सल्लागाराची नेमणूक करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका आकर्षक मत्स्यालयाचाही समावेश असेल. या प्रकल्पाची संकुल अंदाजित किंमत सुमारे रुपये १ हजार कोटी आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com