Nitesh Rane sentence suspension details
esakal
कणकवली : महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने (Nitesh Rane High Court stay news) स्थगिती दिली. न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायालयात या संदर्भातील सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी जूनमध्ये होणार आहे.