Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Uday Samant latest statement on industries : महाराष्ट्रातून कोणतीही कंपनी बाहेर गेलेली नसून निष्क्रिय कंपन्यांवरच कारवाई झाल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.
Maharashtra company closure controversy

Maharashtra company closure controversy

esakal

Updated on

रत्नागिरी : राज्यात उद्योग क्षेत्राचे स्थलांतर आणि कंपन्या बंद पडण्यावरून विरोधकांकडून सुरू असलेला प्रचार हा निव्वळ फेक नॅरेटिव्ह आणि राजकीय स्टंट आहे. केवळ कागदावरच्या निष्क्रिय कंपन्यांवर नियमानुसार कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातून कोणतीही कंपनी बाहेर गेलेली नाही. २०१५-१६ मधील ६ लाख ७८ हजार नोंदणीकृत कंपन्यांचा आकडा होता. तोच मोदी सरकारच्या काळात वाढून तब्बल २१ लाख १७ हजारांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत अहवालानुसार परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात अव्वल स्थानावरच आहे, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com