Deepak Kesarkar
esakal
सावंतवाडी : ‘माझी तब्येत ठीक नसल्याने प्रचाराला बाहेर पडू शकत नाही. याचा फायदा घेऊन चुकीची वक्तव्ये होत असतील तर ते योग्य नाही. माझ्या नावाने मत मागणे हा जनतेमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार आहे. कोणीही अशा प्रकारांना बळी पडू नये. जेव्हा माझ्या विरोधात कटकारस्थान होते, तेव्हा सावंतवाडीकर माझ्या मागे उभे राहतात. आज माझे राजकीय करिअर संपवण्याचा आखलेला कट जनतेने ओळखावा आणि मतपेटीतून त्यांना उत्तर द्यावे, असे प्रत्युत्तर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेत दिले.