महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसने केल्यात `या` मागण्या

Maharashtra ST Workers Congress Demand Sindhudurg Marathi News
Maharashtra ST Workers Congress Demand Sindhudurg Marathi News

कणकवली ( सिंधुदुर्ग ) - राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे मे आणि जूनमधील थकीत वेतन द्यावे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबुतीसाठी अनुदान देऊन महामंडळाला सक्षम करावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) च्यावतीने आज उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना देण्यात आले. 

राज्यातील एसटी महामंडळाचा डोलारा सावरण्यासाठी इंटकने पुढाकार घेत आज राज्यभर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा उपक्रम राबविला होता. या अनुषंगाने इंटकच्या वतीने आज जिल्हा मुख्यालयात एकत्रीत येत आंदोलन केले. त्यानंतर इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे, विभागीय सचिव एच. बी. रावराणे, खजिनदार आशिष काणेकर, मीडियाप्रमुख सुधीर सावंत आदींनी श्री. जोशी यांना हे निवेदन दिले. 

जिल्ह्यात 22 मार्चपासून संचारबंदी होती. तेव्हापासून एसटी सेवा बंद केली. यामुळे रा. प. महामंडळाचे दररोज 22 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. यात महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महामंडळाचा सध्याचा संचित तोटा 6 हजार कोटींवर आहे.

महामंडळ शासन अंगीकृत असून, सर्वसामान्य जनतेला योग्य दरात वाहतूक सेवा देण्याच्या अनुषंगाने महामंडळ सक्षम करण्याची गरज आहे. वाढत्या संचित तोट्याचा विचार करता दर्जेदार सेवा, कर्मचारी पगार व इतर बाबींसाठी शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय शक्‍य नाही, असे निवेदनात म्हटले आहे. 

करण्यात आलेल्या विविध मागण्या 

  • इतर राज्याप्रमाणे 17.5 टक्‍केऐवजी 7 टक्‍के प्रवासी कर आकारला जावा. 
  •  मोटारवाहन कर माफ करण्यात यावा. 
  • डिझेलवरील कर माफ करावा. 
  • स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मालमत्ता कर माफसंदर्भात शासन आदेश पारित करण्यात यावेत. 
  • वस्तू व सेवा करता सूट देण्याबाबत कार्यवाही करावी. 
  • परिवर्तन बस खरेदीसाठी अर्थसाहाय्य द्यावे. 
  • महामंडळाच्या आर्थिक सक्षमतेसाठी उपाययोजना करा. 
  • खासगी कंत्राटे रद्द करा, मागील चार वर्षात झालेल्या कामाच्या खर्चाची श्‍वेतपत्रिका काढा. 
  • कंत्राटी अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या रद्द करा. 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com