मडगावात फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची 'सुवर्ण' कामगिरी; साळगाव, माणगावातील खेळाडू चमकले

मडगावात फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राची 'सुवर्ण' कामगिरी; साळगाव, माणगावातील खेळाडू चमकले

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मडगाव (गोवा) (Madgaon Goa) येथे झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट चॅम्पियन फुटबॉल (National Youth Sports Champions Football)स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक मिळवीत चषकावर आपले नाव कोरले. यात साळगाव व माणगाव (Salgaon and Mangaon)गावातील चार खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केली.

Maharashtra team wins gold in National Youth Sports Champions Football Tournament sports news

नॅशनल युथ स्पोर्ट चॅम्पियनशिपन यांच्या संयुक्त विद्यमाने चर्च स्पोर्ट कॉम्प्लेक्‍स मडगाव (गोवा) येथे नॅशनल स्पर्धा झाल्या. यावेळी फुटबॉलमध्ये महाराष्ट्र राज्याने सुवर्णपदक मिळविले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळगाव व माणगाव (ता.कुडाळ) या ग्रामीण भागातील खेळाडूंचा समावेश होता. यामध्ये कल्पेश डिचोलकर (साळगाव), लक्ष्मण जाधव (साळगाव), प्रज्वल साळुंके (माणगाव ), वसंत कदम (माणगाव) या खेळाडूंचा सहभाग होता.

स्पर्धेमध्ये १६ राज्याने सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या अंतिम सामना कर्नाटक राज्याशी झाला. यावेळी महाराष्ट्र संघाने कर्नाटक वर २-१ ने पराभूत करून करून नॅशनल युथ स्पोर्ट चॅम्पियन चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी येथील तालुका भाजप युवाध्यक्ष रुपेश कानडे व साळगाव विद्यालयाचे पिळणकर यांनी आर्थिक मदत करून स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंची इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमध्ये निवड झालेली असून येत्या ऑगस्टमध्ये मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंची निवड झाली आहे. या पुढील स्पर्धेसाठी रूपेश कानडे, साळगाव विद्यालय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, भारतीय जनता पार्टी डून अभिनंदन करण्यात आले.

Maharashtra team wins gold in National Youth Sports Champions Football Tournament sports news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com