Vidhan Sabha 2019 : कणकवली : भाजपच्या राणेंना शिवसेनेचे आव्हान

Satish-and-Nitesh
Satish-and-Nitesh

विधानसभा 2019 : कणकवली मतदारसंघात कणकवलीसह देवगड आणि वैभववाडी तालुके येतात. मुळात हा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा गड मानला जायचा. गेल्या वेळी काँग्रेसकडून नितेश राणे निवडून आले. येथे राणे विरुद्ध युतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपचा मुकाबला व्हायचा. मात्र, या वेळी नितेश यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेने राणेंपासून दुरावलेले जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी दिली. सावंत हेही लढतीतील तगडे दावेदार मानले जातात. शिवसेनेने त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी केली. येथे शिवसेना विरुद्ध राणे असा मुकाबला रंगलाय.

सतीश सावंत
बलस्थाने

    सह्याद्रीच्या पट्ट्यात संघटनेवर असलेला प्रभाव.
    सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून केलेले काम.
    शिवसेनेने उभी केलेली संघटनात्मक ताकद.
    राणेंच्या विरोधकांचा पाठिंबा.

उणिवा
    शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ नसल्याने संघटनात्मक मर्यादा.
    देवगडसारखी भाजपचा गड असलेली व्होटबॅंक.

नितेश राणे
बलस्थाने

    नारायण राणेंचे गुडविल.
    गेल्या पाच वर्षांत नितेश राणेंनी उभारलेली संघटना.
    भाजपची पारंपरिक मते. 
    निवडणूक जिंकण्याचे कसब असलेली कार्यकर्त्यांची फळी.
    गेल्या पाच वर्षांत केलेली कामे.

उणिवा
    नाणार पाठिंबा किंवा विरोधाबाबतची संभ्रमावस्था.
    युतीतील मित्रपक्ष शिवसेनेची विरोधातील ताकद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com