पावस जिल्हा परिषद गटातील पाच गावात "महाविकास आघाडीचचा फॉर्म्युला

Mahavikas Aghadi In Five Villages In Pawas Zilla Parishad Section
Mahavikas Aghadi In Five Villages In Pawas Zilla Parishad Section

पावस ( रत्नागिरी ) - आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावस जिल्हा परिषद गटामध्ये पाच ग्रामपंचायतींत निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या वेळी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला येथेही वापरून शिवसेना पाचही ग्रामपंचायतींवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे. 

सरपंचपदाच्या आरक्षणानंतर मोर्चेबांधणीला आणखी वेग येईल. पावस जिल्हा परिषद गटातील नाखरे, पावस, शिवार आंबेरे, गावखडी व गट ग्रामपंचायत डोर्ले, दाभिळ आंबेरे या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या गटातील तीन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे, दोन ठिकाणी भाजपचे आणि एका ठिकाणी गाव पॅनेलचे वर्चस्व आहे.कोरोनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. यापूर्वीच सर्व प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे; सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. 

सध्या शिवार आंबेरे व नाखरे ग्रामपंचायतीवर आमदार सामंत गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. गेली पावस ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व असूनही गेल्यावेळी गाव पॅनेलने सत्ता काबीज केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी सेनेत प्रवेश केल्याने गाव पॅनेलचे अस्तित्व संपुष्टात आले. सरपंचपदी आमदार गटाच्या समर्थक महिला उमेदवार सरपंच झाल्या. त्यामुळे गाव पॅनेलचा ग्रामपंचायत सदस्य लवकरच अधिकृतरित्या सेनेत प्रवेश करणार आहे. 

गावखडी ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलचे वर्चस्व असल्यामुळे वीस वर्षांची सेनेची सत्ता जाऊन त्या ठिकाणी गाव पॅनलची महिला सरपंचपदी बसली होती. नऊपैकी सहा सदस्य गाव पॅनेलचे होते. परंतु सेनेची ताकद वाढल्यामुळे नव्या-जुन्यांना एकत्र करून निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेली अनेक वर्षे डोर्ले, दाभिळ आंबेरे या गट ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. ते अबाधित राखण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होणार आहेत; मात्र महाआघाडीचा फॉर्म्युला राबवून शिवसेना येथे सत्ता परिवर्तन करण्याच्या तयारीत आहेत.

शिवसैनिकांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. येथे अनेक वर्षे युती करून लढणारी सेना-भाजप यावेळी आमनेसामने लढणार असल्याने भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, शिवसेनेचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दृष्टीने या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. 

युवा नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश 
आरक्षणानंतरच पावस व नाखरे येथील दोन युवा नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्‍यता आहे. याबाबतच्या सर्व चर्चा स्थानिक व वरिष्ठ पातळीवर पूर्णत्वाला गेल्या असून सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी या दोघांचा व त्यांच्या समर्थकांचा प्रवेश निश्‍चित करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com