zp school
sakal
पाली - रायगड जिल्ह्यात सध्या जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या 'यलो अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, तसेच सर्व प्रकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. हा आदेश शुक्रवारी (ता.19) पासून ते ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.