चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक

सुनील पाटकर
बुधवार, 11 जुलै 2018

महाड :  रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा तालुक्यांमध्ये भरदिवसा चोऱ्या, घरफोडी, मोटार सायकल व मोबाईल इत्यादी 22 चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना हव्या असणाऱ्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच महाड, गोरेगाव, व माणगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने महाड, माणगाव, महाड, कोलाड, रोहा, पोलादपूर एमआयडिसी, गोरागाव, माणगाव, निजामपूर या भागात धुमाकूळ घातला होता.

महाड शहरात काही दिवसांपूर्वी तब्बल बारा ठिकाणी चोऱ्या झाल्या असून त्यातील बहुसमंख्य चोऱ्या दिवसाढवळ्या झाल्या आहेत. चवदार तळे, काकरतळे, मोहल्ला यासह महाड एमआयडिसी, बिरवाडी या भागात या चोरांच्या टोळीने कहर केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, माणगाव पोलिस उपअधिक्षक दत्ता नलावडे, महाडचे निरिक्षक पंकज गिरी 
व पथकाने साहिलनागर भागातील हैदर पठाण, सलिम शेख, रहिम शेख, हुसेन ढांगू, शब्बीर शेख व साहिल सुकूम यांना महाड व माणगाव येथून ताब्यात घेतली आहे.

या टोळीने एकूण 11 घरफोड्या व 09 मोटारसायकल, 04 मोबाईल्स व इतर चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्यात देखील अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असुन त्यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहा.पोलीस निरीक्षक नंदकुमार सस्ते यांनी एकूण 12 लाख 89 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 9 मोटारसायकल व 4 मोबाईल्स, हस्तगत केलेले आहेत.

Web Title: major crime involve thieves arrested