

Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
esakal
-अमित गवळे,
पाली: सुधागड तालुक्यातील पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर रस्त्याची झालेली दुरवस्था किती भयानक आहे, याचा प्रत्यक्ष प्रत्यय बुधवारी (ता. 1) आला. पाली येथून ४२ प्रवासी घेऊन पाच्छापूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला बुधवारी (ता. १ जुलै) दुपारी भीषण अपघाताला सामोरे जावे लागले असते. रस्त्यावरील प्रचंड खड्डे आणि चिखलातून वाट काढताना ही एसटी बस थेट रस्त्याखाली गेली आणि पलटी होता-होता थोडक्यात वाचली. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या कमालीच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व ४२ प्रवासी सुखरूप आहेत.