मालवण आगारास साडेसात लाख उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मालवण - आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी जादा बसफेऱ्यांच्या माध्यमातून येथील एस.टी. आगारास ७ लाख ४५ हजारांचे उत्पन्न मिळाले. ४२ जादा बसेसच्या माध्यमातून ८२० फेऱ्या यात्रोत्सवासाठी सोडल्या होत्या. याचा ४४ हजार १०५ प्रवाशांनी लाभ घेतला. गतवर्षीच्या तुलनेत १ हजार कमी भाविकांनी प्रवास केला तरी एस.टी.ला १ लाख १८ हजाराचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी दिली. 

आंगणेवाडी यात्रोत्सवात जिल्हाभरातील १५० जादा बसेस सोडल्या होत्या. यात्रोत्सवाच्या आदल्या दिवशीपासून ते ३ मार्चपर्यंत या जादा बसफेऱ्यांच्या माध्यमातून मालवण-आंगणेवाडी मार्गावर मालवण-आडारी, महान, मार्गे आंगणेवाडी, तर मालवण-कोळंब, कांदळगाव मार्गे आंगणेवाडी, तसेच अन्य मार्गावरून या बसफेऱ्या सोडल्या होत्या. गतवर्षी ४५ हजार प्रवांशासह आगाराला ६ लाख २७ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी या उत्पन्नात व प्रवाशांत वाढ झाल्याचे दिसून आले. आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक, वाहक, मेकॅनिक, अन्य कर्मचारी यांनी मेहनत घेऊन चांगली सेवा दिली.

येथील आगारातून आंगणेवाडीत यात्रेसाठी एस.टी. वाहतुकीचे खास नियोजन केले होते. यात संतोष पाटील, एस. व्ही. साळकर, डी. सी. ढोलम, आर. पी. चव्हाण, अश्‍विन भोगले या चालकांनी त्यांच्या ताफ्यातील बसेस सजविल्या होत्या. एस.टी. प्रशासनाच्या सहकार्याने श्री. पाटील स्वखर्चाने बस सजवतात. तिला वेगळा साज देऊन प्रवाशांचेही लक्ष वेधून घेतात. बसच्या दर्शनी भागात तोरण, फुलांचे हार, तसेच गाडीत प्रवाशांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भक्तिगीतांचीही सोय केली होती. यासाठी आगार व्यवस्थापक संतोष बोगरे, वाहतूक निरीक्षक डी. डी. कदम, सहायक वाहतूक निरीक्षक ए. एस. न्हिवेकर आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: malvan depo income