एटीएम पासवर्डद्वारे ५१ हजारांना गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मालवण - बॅंकेतून बोलतोय असे सांगत एटीएमचा नंबर घेऊन एटीएम ग्राहकांना गंडा घालण्याचे प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच तालुक्‍यातील दोन ग्राहकांना ५१ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. संबंधितांनी येथील पोलिस ठाण्यात येत याबाबतची तक्रार दिली आहे.  

कट्टा येथील मधुकर रघुनाथ वराडकर यांना ५ ला तर देवली येथील समीर सत्यवान आळवे यांना ७ ला बॅंकेतून बोलतोय असे सांगत एक निनावी फोन आला. एटीएम कार्डवरील १६ अंकी नंबर त्यावेळी घेण्यात आले. त्यानंतर वराडकर यांच्या बॅंक खात्यातून १६ हजार तर आळवे यांच्या खात्यातून ३५ हजार रक्कम काढण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बॅंकेशी संपर्क साधला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. 

अखेर दोघांनीही काल येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदारांना सूचित करताना यापुढे अशा फसवणुकीच्या प्रकारांना बळी न पडता बॅंकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. एटीएम नंबर मागुन खात्यातील रक्कम काढण्याचे प्रकार वाढत आहेत. यात पोलिसांनी सर्वत्र फलक लाऊन खबरदारीचे आवाहन केले असतानाही अनेक ग्राहक याला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. 

कॉल फसवेच...
कोणतीही बॅंक एटीएम किंवा तत्सम माहिती मोबाईलवर मागत नाही. त्यामुळे असे कॉल नेहमीच फसवे असतात. अशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. संबंधितांनी केलेला फोन नंबरही फसवा असतो. अशा प्रकारांना बळी पडू नका, असे आवाहन बॅंक व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: malvan konkan news 51000 theft by atm password hack