मालवण - मुंबई रातराणी एसटी बस सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली आहे.

मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली. 

मालवण आगारातून मुंबई व पुणे येथे जाण्यासाठी साधी बस, हिरकणी व शिवशाही बसचे नियोजन केले आहे. कोल्हापूर-पुणे मार्गावर दोन शिवशाही, एक साधी परिवर्तन व एक हिरकणी बस सोडण्यात येते. मुंबई मार्गावर सकाळच्या सत्रात मालवण-मुंबई ही एकमेव बसफेरी सुरू होती. उन्हाळी सुट्टीच्या हंगामात प्रवाशांच्या मागणीप्रमाणे 19 मे ते 6 जून या कालावधीत 'रातराणी' बसफेरी सुरू करण्यात आली आहे.

मालवण ते मुंबई ही बस मालवण बसस्थानकातून सायंकाळी चार वाजता सुटणार आहे. तसेच रातराणी बससेवा साधी परिवर्तन बसमधून होणार असल्याने प्रवाशांचा प्रवासही आवाक्‍याच्या दरात होईल. मुंबई मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आल्याने परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे, असे बोधे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malvan - Mumbai Ratrani Bus starts