Nilesh Rane on Supriya Sule becoming Chief Minister
esakal
मालवण : शक्तिपीठ मार्गाला होत असलेल्या विरोधाबाबत प्रशासनाने भूमिपुत्रांशी एकदा नाही, तर अनेकदा चर्चा करायला (Shaktipeeth Highway opposition in Maharashtra) हवी. यात संवादातूनच मार्ग काढणे आवश्यक आहे, असे मत आमदार नीलेश राणे यांनी येथे व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होणार, ही केवळ अफवा असू शकते. गुणवत्तेवर असे होऊ शकत नाही आणि महायुतीमध्ये अशा कोणत्याही चर्चा सुरू नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.