Malvan ST Bus: चालत्या एसटीतून अचानक धुराचे लोट; कुपेरी घाटीत प्रवाशांची खिडकीतून उडी

Malvan ST Bus Smoke Incident, Passengers Jump from Windows in Panic : मालवणच्या कुपेरी घाटीत चालत्या सीएनजी एसटी बसमधून अचानक धूर निघाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. भीतीपोटी काही प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या.
Passengers Panic as Smoke Emerges from a CNG ST Bus in Kuperi Ghat Near Malvan

Passengers Panic as Smoke Emerges from a CNG ST Bus in Kuperi Ghat Near Malvan

esakal

Updated on: 

मालवण : वेंगुर्ले येथून मालवणच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट निघाल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या घटनेत गाडीला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी धावत्या प्रसंगात खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. कुपेरी घाटीत ही घटना घडली. जखमी तरुणीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मालवण येथील एक युवती कुडाळ येथे कामाला जाते. काल रात्री उशिरा ती कुडाळ-मालवण सीएनजी बसने मालवणला येत असताना ‘काळसे होबळीचा माळ’ येथे बस बंद पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com