

खेड : ठाणे-मुंबई येथून चालत गावी येणारे तालुक्यातील वरची मुंबई येथील सदाशिव भिकू कदम (वय 58) यांचा महाड तालुक्यातील विन्हेरे जंगलभागात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. 9) दुपारी उघडकीस आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याच ठिकाणी त्यांच्यावर विन्हेरे व वरची हुंबरी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदाशिव कदम हे नोकरीनिमित्त ठाणे येथे वास्तव्यास होते. लॉकडाऊनमुळे 4 मे रोजी ते गावी येण्यासाठी पायी प्रवासाला निघाले. 6 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी पत्नीशी संपर्क साधून सायंकाळपर्यंत घरी येतो असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत होता. विन्हेरे सुतारवाडी नजीकच्या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलांना शनिवारी दुपारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत महिलांनी स्थानिक पोलिसपाटील व सरपंचांना कळविले. त्यांनी विन्हेरे मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून याची कल्पना दिली. मृतदेह कुजलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. खिशातील ओळखपत्रावरून मृतदेहाची ओळख पटली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. वरची हुंबरीतील दहा ते बारा ग्रामस्थ घटनास्थळी पोचले. मृतदेहाची अवस्था पाहून त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली असा परिवार आहे.
हे पण वाचा - ब्रेकिंग - लांज्यात कोरोनाची एन्ट्री, दोन जणांना लागण
सहकार्यांची साथ सोडली नसती तर...
ठाणे-मुंबईतून पायी गावी येणारे कदम हे दापोलीतील सहकार्यांसमवेत ठाणेहून निघाले होते. हे सर्वजण कशेडीनजीक आले असता पोलिस पकडतील या भीतीपोटी त्यांनी अचानक मार्ग बदलला. विन्हेरे मार्गे जंगलमय भागातून जाण्याचा मार्ग पत्करत ते एकटेच जंगलातून प्रवास करत राहिले. याच दरम्यान चालत असताना त्यांचा मृत्यू झाला असावा. आपल्या सहकार्यांची साथ सोडली नसती तर कदाचित कदम वाचले असते, अशी चर्चा होत आहे.
हे पण वाचा - धक्कादायक ; गावचे कारभारीच आहेत मानधनाविना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.