आगामी निवडणुकीत मनसे ताकद दाखवणार; पक्ष बांधणीला जोर

नेतृत्वाअभावी आलेली मरगळ झटकणार; पुढील काही महिन्यांतच चित्र स्पष्ट
Politics
Politicsesakal
Summary

नेतृत्वाअभावी आलेली मरगळ झटकणार; पुढील काही महिन्यांतच चित्र स्पष्ट

लांजा : ‘आगामी काही काळातच तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुका लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या निवडणुकीत आपण दाखवून देणार आहोत. त्यासाठी आतापासूनच आपण पक्ष संघटना बांधणीवर जोर दिला आहे. पुढील काही महिन्यांतच याचे चित्र स्पष्ट होईल,’ असे प्रतिपादन मनसेचे लांजा तालुका सहसंपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांनी केले.

तालुक्यात युवकांची मजबूत फळी तयार करून त्याद्वारे मनसे पक्ष संघटना बांधणीवर जोर देऊन पक्षाला पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून देणार असल्याची माहिती देताना पाथरे यांनी सांगितले, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर तालुक्यात पक्षाची व्यवस्थित घडी बसली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात पक्ष संघटनेला तालुका पातळीवर योग्य असे नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे पक्ष संघटनेवर मरगळ आली होती. आपण तालुक्याचे सुपुत्र या नात्याने पुन्हा एकदा लांजा तालुक्यात मनसे पक्ष संघटना बांधणीवर भर देणार आहोत.

Politics
गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडीचा तरुण ठार; 2 जण गंभीर जखमी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्ष बांधणीवर जोर दिला असून, तरुणांना एकत्र करून त्यांची मजबूत फळी आपण तालुक्यात काम करणार आहोत. त्या माध्यमातून जनतेचे स्थानिक पातळीवर प्रश्न सोडविण्यावर आपण भर देणार आहोत. सद्यस्थितीत पक्ष संघटना बांधणी आणि पक्ष संघटना मजबुतीकरण करणे, हेच आपले ध्येय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनविसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, तसेच मनसेचे लांजा संपर्क अध्यक्ष आणि मनसे टेलिकॉम सेनेचे सरचिटणीस अशा विविध पदांवर युवानेते मनीष यानी काम केले.

चिरेखाणीवर काम करणाऱ्यांचा प्रश्न

गत महिन्यात पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या पश्चिम भागातील चिरेखाणीवर काम करणाऱ्या तरुणांचा कामाचा प्रश्न मार्गी लावला होता. तशाच प्रकारचे प्रश्न आगामी काळात मार्गी लावून पुन्हा एकदा लांजा तालुक्यात मनसे पक्षाला गतवैभव मिळवून देणार असल्याचे पाथरे यांनी सांगितले.

Politics
'थ्री इन वन' सरकारला मुस्लिम आरक्षणाचा विसर पडला ; ओवैसींचा घणाघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com