

Ongoing highway widening work
sakal
मंडणगड : कोकणातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मंडणगड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे सध्या शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबाबत नियोजनातील अस्पष्टता, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन आणि कामाच्या संथ गतीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे.