मंडणगड नगराध्यक्षपदी ॲड. बेर्डे ; आघाडीची बाजी

राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीची नगरपंचायतीत बाजी; उपनगराध्यक्षपदी वैभव कोकाटे
Mandangad Mayor Adv Berde
Mandangad Mayor Adv Berde sakal

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीच्या ॲड. सोनल बेर्डे, तर उपनगराध्यक्षपदी वैभव कोकाटे यांची निवड झाली. निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एका मताच्या फरकाने बेर्डे निवडून आल्या. मंडणगड नगरपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे व मुख्याधिकारी विनोद डवले व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यक्रम राबवण्यात आला.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून विनोद जाधव, तर महाविकास आघाडीकडून अॅड. सोनल बेर्डे यांनी अर्ज दाखल केले होते. सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत हात वर करून निवडणुक मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी अॅड. सोनल बेर्डे यांच्या बाजून ९ नगरसेवकांनी हात वर करून आपले समर्थन जाहीर केले. विनोद जाधव यांना ८ नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एका मताच्या फरकाने अॅड. सोनल बेर्डे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री मोरे यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी आजच अर्ज दाखल करायचे होते. त्यानुसार महाविकास आघाडीकडून वैभव कोकाटे, तर शहर विकास आघाडीच्या वतीने आदेश मर्चंडे यांनी आपले उमेदवारी आर्ज दाखल केले. नगराध्यक्षांच्या निवडीनंतर उपनगराध्यक्षाची निवड प्रक्रियाही हात वर करून राबवण्यात आली. यामध्ये वैभव कोकाटे यांना ९ तर आदेश मर्चंडे यांना ८ नगरसेवकांचे समर्थन मिळाले. एकामताने वैभव कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

माजी आमदारांकडून कौतुक

नगराध्यक्षपदी निवड झालेल्या अॅड. सोनल बेर्डे व उपनगराध्यक्षपदी निवड झालेले वैभव कोकाटे यांचे माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर, रमेश दळवी, भाई पोस्टुरे, सायली कदम, दापोलीचे माजी सभापती राजेश गुजर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, नेहा जाधव, दीपक घोसाळकर, दिनेश सापटे, दिनेश लेंडे, राजाराम लेंढे, राकेश साळुखे व उपस्थित कार्यकर्ते, मान्यवरांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com