दिलासादायक : मंडणगडात ३७ पैकी ३५ कोरोनाबधित पूर्ण बरे ; एकावर उपचार सुरू ; एकाचा मृत्यू

सचिन माळी
Thursday, 23 July 2020


तालुक्यात २३ जुलै पर्यंत १७३३८ नागरिकांना होम क्‍वारंटाईन. करण्यात आले होते, त्यातील.... 

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोना लढ्याला सामोरे जाताना मंडणगडात ३४०  स्व्ॅब तपासणीत एकूण ३७ पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णांपैकी ३५ रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. तर एका व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असून एकावर रत्नागिरी ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच तालुक्यात २३ जुलै पर्यंत १७३३८ नागरिकांना होम क्‍वारंटाईन. करण्यात आले होते, त्यातील फक्त ५८३ जणांचा क्‍वारंटाईन. कालावधी शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. तालुक्यात एकूण २२०१३ नागरिक बाहेरून दाखल झाले आहेत. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगलेच असल्याने तालुक्याच्या दृष्टीने ही आशादायी बाब आहे. 

लॉकडाऊनमध्ये पहिल्या दीड महिन्यात मंडणगड तालुक्यात एकही कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आला न्हवता. मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यशासनाने मुंबईत अडकून पडलेल्या कोकणवासीयांनी गावी जाण्याकरिता आपले धोरण बदलल्याने हजारोंच्या संख्येने मुंबईकर खेड व मंडणगडच्या वाटेने मिळेल त्या वाहनाने, प्रसंगी चालतही कोकणात दाखल झाले. मंडणगड तालुक्यातही दहा हजाराहून अधिक चाकरमानी मुंबईकर तालुकावासीय तालुक्यात दाखल झाले. याचा परिणाम दिसून येत अवघ्या तीन दिवसांच्या कालवधीत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधीक 24 रुग्ण मंडणगड तालुक्यात आढळून आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सर्व कोरोनाबाधीतांना मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी होती.

हेही वाचा- गुगल अ‍ॅपवर नोंद :  चिपळूण पालिकेचे पथक पोहचले 9 हजार 470 लोकापर्यंत.. -

एकूण ३४० स्वॅबची तपासणी

पहील्या दीड दोन महिन्याच्या कालावधीत आरोग्य, महसुल व पोलीस यंत्रणेने हाय अर्लटवर राहून काम केल्याने तालुक्यातील दोन तपासणी नाके व सर्व क्‍वारंटाईन सेंटर शंभर टक्के कार्यरत असलेली दिसून आली. मात्र तिडे तळेघर गावात बाधित तरुणाचा वावर झाल्याने ही दोन गावे सील करावी लागली होती, तर तालुक्यातील अन्य कोणत्याही गावात कोरोना बाधित व्यक्तीचा संपर्क न आल्याने अन्य दुसरे गाव सील करण्यात आले नाही. या स्थितीत 11 मे नंतर मोठे बदल झाले.

हेही वाचा-सुस्कारा : आ वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह..कोणाचे वाचा- -

राज्यशासनाच्या बदललेल्या धोरणामुळे तपासणी नाके काही प्रमाणात शिथील झाले. ज्या व्यक्तीमध्ये कुठल्याही आजाराची लक्षणे दिसत नाहीत व ती बाहेरून तालुक्यात नव्याने दाखल झाली आहे, तिची कोरोना तपासणी तिच्यात कुठल्याही आजाराची लक्षणे आढळून येत नाहीत तोवर वावर करता येणार नाही असा नवा फतवा आरोग्य विभागास प्राप्त झाल्याने 11 मे नंतर पन्नास दिवसाच्या कालावधीत तालुक्यातील एकही नवीन स्वॅब घेण्यात आलेला न्हवता.

हेही वाचा- वेध गणेशोत्सवाचे :  गावाकडे यायचे असेल तर चाकरमान्यांना आता एवढे दिवस व्हावे लागणार क्‍वारंटाईन... -

लक्षणे आढळणाऱ्यांचे स्वब तपासणीसाठी रत्नागिरीत पाठवण्यात येत आहेत. २३ जुलै अखेर तालुक्यात एकूण ३४० स्वॅब तपासणी करण्यात आले आहेत. कम्युनिटी स्प्रेडच्या माध्यमातून संसर्गाची स्थिती निर्माण झाल्यास त्या स्थितीला सामोरे जाण्याइतकी येथील आरोग्य यंत्रणा सक्षम नाही हे वास्तव सर्वमान्य असल्याने या रोगाच्या बाधेपासून तालुक्यातील नागरीकांनी शक्य तितक्या दूर राहणे हाच उपाय शिल्लक राहतो.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandangad out of 37 35 corona are completely healed Start treatment on one Death of one