esakal | मंडणगड : पेवे-उंबरशेत खलाटीत सापडले 9 गावठी बॉम्ब
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड : पेवे-उंबरशेत खलाटीत सापडले 9 गावठी बॉम्ब

या संदर्भात पुढील तपासास बाधा येऊ नये याकरीता अधिकच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.

मंडणगड : पेवे-उंबरशेत खलाटीत सापडले 9 गावठी बॉम्ब

sakal_logo
By
सचिन माळी.

मंडणगड : तालुक्यातील पेवे उंबरशेत खलाटी येथे मंडणगड पोलिसांना 9 गावठी बॉम्ब सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. गावठी बॉम्ब सापडण्याची मंडणगड तालुक्यातील ही पहिलीच वेळ असल्याने या संदर्भात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. या संदर्भात मंडणगड पोलिस स्थानकांतून मिळालेल्या माहितीनुसार, पेवे उंबरशेत खलाटी या ठिकाणी पोलिस पथकाने सापळा रचून केलेल्या धडक कारवाईत तीन संशयीत, आरोपींसह 9 गावठी बॉम्बचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा: आता 10 मिनीटांत नाश्तासाठी बनवा धिरडे ; जाणून घ्या रेसीपी

या संदर्भात पुढील तपासास बाधा येऊ नये याकरीता अधिकच माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही. या विषयासंदर्भात पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून अधिक तपास युध्द पातळीवर सुरु आहे. बुधवारी केलेल्या कारवाईत पोलिस निरिक्षक शैलजा सावंत, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक गफार सय्यद, पोलिस कॉन्स्टेबल वैभव गमरे, पोलिस कॉन्स्टेबल ऋषिकेश देसाई यांनी सहभाग घेतला.

गावठी बॉम्बचा वापर नेमका कशासाठी ?

खरीपाच्या हंगामात भात शेतीचे पिक हातात येण्याच्या कालावधीत जंगली श्वापदांचा शेतीस उपद्वव वाढतो. याकरिता शेतकरी शेतीच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करतात. यात फासकीचा सर्रास वापरही केला जातो. शेतकऱ्यांनी मागणी करुनही श्वापदांना रोखण्यासाठी वनखात्याकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने त्यांना जमतील ते उपाय करावे लागतात. पेवे पणदेरी पट्यात भातशेतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे गावठी बॉम्बचा वापर जंगली श्वापदाना रोखण्यासाठी केला जात होता. केवळ शिकारीच्या उद्दशाने गावठी बॉम्ब ठेवण्यात आले होते. यामागे आणखी कोणती कारणे होती. या प्रश्नाची उत्तरे तपासानंतरच मिळणार आहेत. जंगली श्वापदांनी पिकांची नुकसानी केल्यास त्यास नुकसान भरपाई देण्याची कोणतेही कायदेशीर तरतूद प्रशासकीय नसल्याची गंभीर बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा पुढे आली आहे.

हेही वाचा: विट्यातील थरारक घटना ; पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

loading image
go to top