आधी गॉगल गॅंगची चौकशी करा - मंदार केणी

आधी गॉगल गॅंगची चौकशी करा - मंदार केणी

मालवण - अर्थपूर्ण तडजोड शब्द आमदार वैभव नाईक यांच्या तोंडी शोभत नाही. स्वाभिमानवर अर्थपूर्ण तडजोडीचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षातील गॉगल गॅंगकडे लक्ष देत त्यांनी भरावाच्या ठेकेदाराकडून केलेल्या अर्थपूर्ण तडजोडीची चौकशी करा. उगाच पारदर्शकतेच्या बाता मारू नका, असे प्रत्यूत्तर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून दिले.

कोळंब पुलाच्या कामाबाबत स्वाभिमानने चौकशीची मागणी केली होती. याला आमदार नाईक यांनी पारदर्शक कारभार होणार असल्याचे सांगत अर्थपुर्ण तडजोडीसाठी आरोप होत असल्यास त्याची दखल घेणार नसल्याचे उत्तर दिले होते. याला प्रत्यूत्तरासाठी येथील पंचायत समितीच्या सभापती दालनात पत्रकार परिषद झाली.

श्री. केणी म्हणाले, ""कोळंब पुलाचे गेली तीन वर्षे काम सुरू असल्याने कोळंब पंचक्रोशीतील सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा. या पुलाच्या दुरुस्तीचे ढिसाळ काम ठेकेदाराकडून होत असताना त्याला एक नोटीसही बजावण्याची कार्यवाही झाली नाही. पुलाच्या बांधकामासाठी खाऱ्या पाण्याचा वापर झाला. बोगस स्टील, पुलाखाली नदीपात्रात चुकीच्या पद्धतीने भराव टाकला यावर आमदार का बोलत नाहीत. प्रत्यक्षात साडे तीन कोटी रुपये दुरुस्तीच्या खर्चासाठी आवश्‍यक असताना त्याला साडेआठ कोटी रुपयांचा निधी का लागला याचे स्पष्टीकरण आमदारांनी करायला हवे होते. पुलाच्या दुरुस्तीनंतर 16 ते 20 टनाच्या वाहतुकीची मर्यादा का ? 15 कोटीत नवीन पूल होणार असेल तर दुरुस्तीसाठी साडेआठ कोटी रुपये खर्च का करण्यात आले ?''

हिंमत असेल तर आमदारांनी पुलाच्या कामाची चौकशी करण्याची धमक दाखवावीच. स्वाभीमान पक्षाला तुम्हाला निवेदन देण्याची गरज नाही. योग्य त्याठिकाणी आम्ही निवेदन देऊच. तालुक्‍यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची 15 टक्के जादा दराने का केली जात आहेत. ठेकेदाराकडून निवडणुकीसाठी निधी कोण जमा करत आहे त्याचीही चौकशी करा. त्यामुळे आमदारांनी आमच्याशी पारदर्शकतेच्या बाता करू नयेत असेही श्री. केणी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com