
रत्नागिरीत काजू बागांवर फांदीमर...शेकडो एकरवर प्रादुर्भाव; कृषी विभागाकडून बागांची पाहणी..
आंबा ,काजू वरील रोगांचा नायनाट करायचा आहे ...हे वाचा..
रत्नागिरी : वाढलेला पावसाचा हंगाम आणि बदलत्या वातावरणाचा फटका रत्नागिरी तालुक्यातील काजू बागांवर दिसू लागला आहे. बुरशीमुळे फांदीमर या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. शंभरहून अधिक एकर बागांवर त्याचा प्रादुर्भाव झाला आहे. टिमास्कीटो व फुलकिडीचा आढळ होत असल्याने नवीन पालवी पूर्ण सुकली. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होईल, अशी भीती काजू बागायतदारांनी व्यक्त केली आहे
बदलत्या वातावरणाचा फटका कोकणातील आंबा, काजू उत्पादनावर होत आहे. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे आंब्याबरोबर काजूला येणारा मोहोर लांबला. जानेवारी महिन्यात काही ठिकाणी बागा मोहोरलेल्या पाहायला मिळत आहे; परंतु या वातावरणामुळे काजूवर येणाऱ्या पालवीवर बुरशीजन्य रोगांचा अटॅक होत आहे.
हेहा वाचा-कातळशिल्प संवर्धनासाठी 24 कोटी, पण प्रत्यक्षात...
फांदीमरचा भसमासूर
रत्नागिरी तालुक्यात शेकडो एकर काजू बागांमध्ये फांदीमर होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत होत्या. त्यानुसार तरवळ, आगवे, विल्ये, उक्षी येथील कृष्णा मालप, रमेश मालप, गुणाजी मालप, संतोष देसाई यांच्या बागांचे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, मंडळ कृषी अधिकारी जयेश काळोखे, बापुराव शेंडगे, नितीन रांजण, रुपाली वायाळ यांच्यासह काजू बागांची पाहणी केली.
हेही वाचा- पार्टीला गेले आणि अडकून पडले तब्बल अठरा युवक अन्.....
पालवी सुकूल्यामुळे मोहोर गायब
त्या परिसरातील अनेक काजूच्या झाडांवर फांदीमर आढळून आले. पालवी सुकून गेल्यामुळे त्यावर मोहोर येणेच शक्य नसल्याचे दिसत आहे. त्याचा फटका उत्पादनावर होईल असे काजू बागायतदार कृष्णा मालप यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले.दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ओले काजूगर बाजारात विकण्यासाठी दाखल होतात. यंदा जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात ओल्या काजूगरांची विक्री सुरू झाली. ती ही एखाद दुसऱ्या स्टॉलवर पाहायला मिळते. उत्पादनच कमी असल्यामुळे किलोला २२०० ते २५०० रुपये असा सोन्याचा दर मिळत आहे. वीस रुपयांना तिन काजूगर विकले जात असून खवय्यांची पंचाईत झाली आहे
.हेही वाचा- तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कोण देणार.... ?
या सूचनांचे पालन करा
कीटकशास्त्रज्ञ डॉ. वानखेडे यांनी फांदीमरची पाहणी केल्यानंतर त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. लॅम्ब्डासायहॅलोथ्रिम पाच टक्के सहा मिली किंवा प्रोकेनोफॉस ५० टक्के १० मिली तसेच फांदीमर शेंडेमर रोगांसाठी एक टक्का बोर्डोमिश्रणाची किंवा कॉपरऑक्सी क्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाण्यामधून फवारणी करावी. तसेच फवारणीपूर्वी रोगग्रस्त पाने, फांद्या, शेंडे कापून जाळून नष्ट करावीत, अशा सूचना डॉ. वानखेडे यांनी दिल्या आहेत.