यंदा आंबा निर्यातीत वाढ होण्याची शक्यता ; निर्यातदार पोचले थेट बागांमध्ये

mango net policy this year registration increased in ratnagiri
mango net policy this year registration increased in ratnagiri

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार हजार ५६६ आंबा बागायतदारांनी निर्यातीसाठी आवश्‍यक असलेल्या मॅंगोनेट प्रणालीवर नोंद केली आहे. त्यामुळे यंदा निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी कमी निर्यात झाली होती.
राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मॅंगोनेटचा पर्याय उपलब्ध करुन दिला होता.

ग्रेपनेटच्या माध्यमातून द्राक्षांची परदेशात निर्यात केली जाते. या धर्तीवर हापूस आंब्याच्या निर्यातीसाठी ही प्रणाली विकसित केली आहे. सहा वर्षापूर्वी याला सुरवात झाली. बागायतदार कोणत्या देशात हापूसची निर्यात करण्यास इच्छुक आहेत, त्याची माहिती ऑनलाईन नोंदवून त्या देशांच्या सूचनेनुसार बागांचे जनत व व्यवस्थापन केले जाते. 

२०१४- १५ पासून मॅंगोनेट सुविधा सुरू झाली. दरवर्षी नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केले जाते. मॅंगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील हापूस परदेशात निर्यात होत आहे. युरोप, जपान, अमेरिका येथील व्यावसायिकांनी रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या थेट बागेत जाऊन पाहणी करुन मागणी केली होती. त्यामुळे येथील बागायतदारांना चांगला दरही मिळाला होता. मॅंगोनेटअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आतापर्यंत चार हजार ५६६ शेतकऱ्यांनी नोंदणी झाली असून, यंदा प्रमाणपत्र नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या तीन हजार ३९९ आहे. त्यातील एक हजार १६७ बागायतदार नवीन नोंदणी करणारे आहे. बरेचसे निर्यातदार हे थेट बागायदारांच्या बागेत येऊन आंबा खरेदीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे बागायतदारांचा वाहतूक खर्च वाचतो आणि जागेवर पैस मिळतात. याचा फायदा घेण्यासाठी बागायतदारांकडून मॅंगोनेटवरील नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com