Vidhan Sabha 2019 : महाडमधून आघाडीचे उमेदवार माणिक जगतापांचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

महाड १९४ विधानसभा मतदारसंघातून महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघासाठी महाडमध्ये काँग्रेस-राष्ट्र्रवादी, शेकाप, महाआघाडी आघाडीतर्फे माणिक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

महाड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जिल्ह्यात उमेदवारांनी आपले अर्ज आज (गुरुवार) दाखल केले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले माणिक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.

महाड १९४ विधानसभा मतदारसंघातून महाड माणगाव पोलादपूर मतदारसंघासाठी महाडमध्ये काँग्रेस-राष्ट्र्रवादी, शेकाप, महाआघाडी आघाडीतर्फे माणिक जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक रायगड जिल्ह्यात प्रतिष्ठेची समजली जात असल्याने शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शक्‍तिप्रदर्शन करण्‍यात आले होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार माणिक जगताप यांनी ही आज सुमारे 13 हजार कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन केले.

Vidhan Sabha 2019 : भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंचे नाव नाहीच

सळीवडी नाक ते शिवाजी महाराज चौक मार्गे मुख्‍य बाजारपेठेतून रॅली काढत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी अपक्ष उमेदवार चंद्रकांत धोंडगे आणि आदिती तटकरे महाआघाडीकडून आणि विनोद घोसाळकर शिवसेना यांनी श्रीवर्धनमधून आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. श्रीवर्धनमधून दोघांनीही शक्तिप्रदर्शन केले. संपूर्ण महाड शहरात आज कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Vidhan Sabha 2019 : सत्ता असतानाही बारामतीचा विकास झाला नाही; पडळकरांचे अजित पवारांवर टीकास्त्र

यावेळी माणिक जगताप यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी, शेकाप महाआघाडीचे पदाधि‍कारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने हजर होते. मात्र, हे शक्तिप्रदर्शन बघता या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manik jagtap File Nomination form Mahad Vidhan Sabha Constituency