Manoj Jarange Mumbai protest Bombay High Court
esakal
मुंबई : ‘मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या मागणीसाठी गतवर्षी आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केले होते. तेव्हा झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यंदा त्यांना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही, ’ असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. ११) स्पष्ट केले. मागील अनुभव पाहता मनोज जरांगे यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक आदेश देण्यास न्यायालयाने नकार देताना लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार असल्याचे नमूद (Maratha Reservation Update) केले.