Maratha Kranti Morcha : पोलादपूरमध्येही महामार्ग रोखला

सुनील पाटकर
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पोलादपूरमधील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती.
सकाळी दहापासून तालुक्यातील मराठा बांधवानी महामार्ग अडवला. नायक मराठा समाज संघटनेचे चंद्रकांत कळंबे,राव मराठा समाजाचे सुरेश मोरे व सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.

महाड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलादपूरमध्येही छत्रपती शिवरांयाच्या पुतळ्यासमोर मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पोलादपूर शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पोलादपूरमधील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली होती.
सकाळी दहापासून तालुक्यातील मराठा बांधवानी महामार्ग अडवला. नायक मराठा समाज संघटनेचे चंद्रकांत कळंबे,राव मराठा समाजाचे सुरेश मोरे व सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. पोलादपूरमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला.

पोलादपूरमधील शाळाही बंद होत्या. एसटी वाहतूक ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील संपर्क तुटला. समाजाच्या वतीने महामार्गावरुन बाजारपेठेतून मोर्चा काढण्यात आला व आरक्षणाबाबतचे  निवेदन तहसिलदार शिवाजी जाधव यांना दिले.या आंदोलनाला मुस्लिम समाज, बेलदार समाजासह अन्य समाज व डॉक्टर संघटनेनेही पाठिंबा दिला

Web Title: Maratha Kranti Morcha Maharashtra Bandh Poladpur Highway