#MarathaKrantiMorcha माणगावात कडकडीत बंद

अमित गवळे
मंगळवार, 24 जुलै 2018

पाली (रायगड) : सकल मराठा समाजाच्या महाराष्ट्र बंद च्या हाकेला माणगाव शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी (ता.24) माणगाव शहरात कडकडीट बंद पाळण्यात आला. तसेच मोर्चेकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

माणगाव शहरात सकाळी बाजारपेठेतील काही दुकाने उघडी होती. मात्र दहा नंतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. दवाखाने व मेडिकल स्टोअर्स उघडी होती. तसेच काही शाळांना देखिल सुट्टी देण्यात आली. सकाळी शाळेत अालेल्या मुलांना लवकर सोडण्यात आले.सकल मराठा समाजाच्यावतीने शहरात मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चेकरी हातात भगवा झेंडा घेवून निघाले होते. मोर्चेकरी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देत होते. पोलीसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: maratha kranti morcha strike in mangao