Maratha Reservation : 18 हजार अभिलेखांमध्ये आढळल्या मराठा-कुणबीच्या फक्त 2 नोंदी; मराठा आरक्षणासाठी सर्व अभिलेखांची छाननी सुरु

मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शासनाविरुद्ध दंड थोपटले आहे.
Maratha Reservation
Maratha Reservationesakal
Summary

दापोली तालुक्यात पोफळवणे आणि कांगवई या दोन गावांमध्ये कुणबी मराठा नोंद आढळून आली आहे.

रत्नागिरी : जरांगे-पाटील यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्यासाठी राज्यातील सर्व अभिलेखांची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजारांहून अधिक अभिलेखांची छाननी करण्यात आली.

Maratha Reservation
Maratha Reservation : OBC मधून मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यांना स्वतंत्र..; काय म्हणाले रामदास कदम?

यामध्ये दापोलीत २ मराठा-कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी शासनाविरुद्ध दंड थोपटले आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील दस्तऐवज तपासण्यात आले.

Maratha Reservation
Gram Panchayat Results : कोल्हापुरात 29 ग्रामपंचायतींत सत्तांतर; 'इतक्या' ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी मारली बाजी, नेत्यांच्या गटांची काय अवस्था?

यात हजारो कुणबी-मराठा नोंदी आढळल्या आहेत. अशा लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी मराठा नोंदीची माहिती तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. या नोंदी तपासण्याबाबत जवळपास संपूर्ण दिवस ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ पार पडली. यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेऊन नोंदी तपासणीबाबत आदेश दिले.

यात दापोली तालुक्यात पोफळवणे आणि कांगवई या दोन गावांमध्ये कुणबी मराठा नोंद आढळून आली आहे. जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा तालुक्यांत आतापर्यंत साडेनऊशेहून अधिक गावांतील अभिलेखांची तपासणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत १८ हजारांहून अधिक नोंदी तपासण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Maratha Reservation
Karnataka Politics : भाजप, धजदचे 35 आमदार लवकरच काँग्रेस पक्षात; उद्योग मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात पुन्हा खळबळ

जिल्ह्यात कुणबी मराठा नोंदी तपासण्यात येत आहेत. दापोली तालुक्यात दोन नोंदी आढळल्या आहेत. सर्व तहसीलमधील अभिलेख तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. १९१० पासून उपलब्ध असलेल्या जिल्ह्यातील नोंदी तपासण्यात येत आहेत.

-एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com