Kunbi Community Uday Samant
Kunbi Community Uday Samantesakal

Maratha Reservation : रत्नागिरीत आढळल्या तब्बल 3.5 लाखांहून अधिक कुणबी नोंदी; दाखल्यासाठी सामंतांनी काढला तोडगा

जिल्ह्यात कुणबी समाज पोट जात म्हणून तिल्लोरी कुणबी नोंद करत आला आहे.
Summary

मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा ११९ नोंदी आढळल्या असून, कुणबी समाजाच्या तब्बल साडेतीन लाखांहून अधिक नोंदी आहेत.

रत्नागिरी : जिल्ह्यात मराठा-कुणबी (Maratha-Kunbi Community) नोंदी तपासताना जुन्या दस्तावेजांमध्ये तब्बल साडेतीन लाखांहून अधिक कुणबी समाजाच्या नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे कुणबी समाज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे, याचा पुरावा तयार झाला आहे.

नोंद असलेल्यांपैकी कुणीही जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केल्यास कोणतीही कागदपत्रे न तपासता निव्वळ त्या नोंदीच्या आधारे दाखला देता येईल. त्यासाठी नोंदी असलेल्या लोकांसाठी शिबिरांचे आयोजन करून संबंधितांना जात प्रमाणपत्र दिली जावीत, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Kunbi Community Uday Samant
Maratha Reservation : भुजबळांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं, अन्यथा..; काय म्हणाले मंत्री विखे-पाटील?

कुणबी समाजोन्नती संघाचे राजापूर तालुक्यातील ग्रामीण शाखेचे अध्यक्ष दीपक नागले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कुणबी दाखले, जात पडताळणी करण्यात येणाऱ्या अडचणी आणि पंतप्रधान आवास योजनेतील त्रुटींविषयी निवेदन दिले होते. त्यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तातडीने बैठकीचे आयोजन करत त्यावर तोडगा काढला आहे.

Kunbi Community Uday Samant
Maratha Reservation : 'जे कुणबी असतील त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल'; काय म्हणाले मुश्रीफ?

तिल्लोरी कुणबी समाजाला कुणबी म्हणून दाखले मिळण्यात मागील वर्षापासून अडचणी येत आहेत. जात पडताळणी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे पावणेदोनशेहून अधिक प्रस्ताव समितीने नाकारले आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून १९१० पासून कुणबी-मराठा प्रमाणपत्रांसाठी आतापर्यंत पंधरा लाखांहून अधिक दस्ताऐवज तपासण्यात आले. त्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा ११९ नोंदी आढळल्या असून, कुणबी समाजाच्या तब्बल साडेतीन लाखांहून अधिक नोंदी आहेत. या नोंदी विचारात घेऊन कुणबी समाजाला दाखले देताना कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करू नये, असे त्यांनी सांगितले आहे.

Kunbi Community Uday Samant
Miraj Politics : काँग्रेसला धक्का देत सिद्धार्थ जाधवांचा ठाकरे गटात प्रवेश; 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

जिल्ह्यात कुणबी समाज पोट जात म्हणून तिल्लोरी कुणबी नोंद करत आला आहे. तिल्लोरी कुणबी म्हणजे कुणबीच असून, देशाच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कुणबी म्हणूनच दाखले मिळत आले आहेत. आज सकारात्मक निर्णय झाला आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ केल्यास समाजाला फायदा मिळेल.

-दीपक नागले, अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण राजापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com