Maratha Reservation : 'आम्ही 96 कुळी मराठा आहोत, कुणबी प्रमाणपत्र घेण्यास आमचा विरोध'; मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि त्याची ताकद दाखविण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.
Maratha Community Kunbi Certificate
Maratha Community Kunbi Certificateesakal
Summary

समाजासाठी वाहुन घेणाऱ्यांना आणि वेळ देणाऱ्यांना संघटनेच्या कार्यकारिणीवर घेतले जाणार आहे.

रत्नागिरी : मराठा समाजाच्या (Maratha Community) शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय आजच्या रत्नागिरी तालुका मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. ही संघटना मराठा समाजाची एकजूट आणि ताकद असेल, असे मत सर्वांनी मांडले.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला (Maratha Reservation) पाठिंबा दर्शविला. मात्र, कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) घेण्यास विरोध दर्शविण्यात आला. शहरातील माळनाका येथील मराठा भवन येथे सायंकाळी रत्नागिरी तालुका समाजाची बैठक झाली. या बैठकीला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. महिला वर्गही मोठ्या संख्येने आला होता.

Maratha Community Kunbi Certificate
कर्नाटक पोलिसांची मुजोरी सुरूच! संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या म्हणून म. ए. समितीच्या 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

समाज एकसंघ ठेवण्यासाठी आणि त्याची ताकद दाखविण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. त्यासाठी संघटनस्थापन करायची का, यावर चर्चा झाली. यावेळी आप्पा देसाई, संतोष सावंत, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, कौस्तुभ सावंत, आदी उपस्थित होते. संघटना स्थापन करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. सर्वांचे मते जाणून घेतल्यानंतर समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि समाजिक उन्नत्तीसाठी रत्नागिरी तालुका मराठा संघटना स्थापन करण्याचा एकमुखी निर्णय झाला.

यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. समाजासाठी वाहुन घेणाऱ्यांना आणि वेळ देणाऱ्यांना संघटनेच्या कार्यकारिणीवर घेतले जाणार आहे. सुरवातीला गावा-गावात जाऊन जागृती केली जाणार आहे.

Maratha Community Kunbi Certificate
Raju Shetti : 'जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही'; राजू शेट्टींचा कारखानदारांना स्पष्ट इशारा

एसटीचे ६ लाखांचे नुकसान

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी जोळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी एसटी महामंडळाने आज घाटमाथ्यावर जाणाऱ्या ५५ फेऱ्या रद्द केल्या. यामुळे एसटीचे सुमारे ६ लाखाचे नुकसान झाल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

Maratha Community Kunbi Certificate
Belgaum News : महाराष्ट्राच्या आमदार, मंत्र्यांनी काळ्यादिनी बेळगावकडं फिरवली पाठ; एकनाथ शिंदेंविरुद्ध मराठी भाषिकांतून संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com