#MarathaKrantiMorcha पाली व परळीत कडकडीत बंद

अमित गवळे 
बुधवार, 25 जुलै 2018

पाली : सुधागड तालुक्यात पाली व परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पाली व परळीत घोषणा देत बुधवारी (ता.25) मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चेकरांनी पाली पोलिस स्थानकात मागण्यांचे निवेदन दिले.

पाली : सुधागड तालुक्यात पाली व परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पाली व परळीत घोषणा देत बुधवारी (ता.25) मोर्चा काढण्यात आला. तसेच मोर्चेकरांनी पाली पोलिस स्थानकात मागण्यांचे निवेदन दिले.

सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष गणपत सितापराव यांच्या नेतृत्वाखाली येथील मराठा समाज सभागृह आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आणि घोषणाबाजी करीत संपुर्ण पाली गावातून मोर्चा काढण्यात आला. दरम्यान मोर्चेकरांनी पाली पोलिस स्थानकांत निवदेन दिले. येथील तहसिल कार्यालयाजवळ मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात सुधागड तालुक्यातील खेड्यापाड्यातील मराठा तरुण, तरुणी, आबालवृध्द स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. पाली व परळी या सुधागड तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असून येथिल दुकानदार व व्यापार्‍यांनी देखील मराठा आंदोलकांना सहकार्य करीत दुकाने बंद ठेवली.

यावेळी सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपतराव सितापराव, सचिव साजेकर, भारत मुक्ती मोर्चा वारकरी सांप्रदायाचे रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प महेश पोंगडे महाराज, सुधागड तालुका मराठा समाज महिला अध्यक्षा निहारिका शिर्के, सचिव स्नेहा भोईर, शिरिष सकपाळ, धनंजय चोरगे, शरद गोळे, प्रदिप गोळे, मराठा समाज युवक अध्यक्ष प्रदिप गोळे, सचिव निलेश शिर्के, उमेश तांबट, संतोष शिंदे, सुरेश आंग्रे, बाळकृष्ण भोईर, राजेंद्र खरिवले, संदिप खरिवले, दिनेश घोलप, सुनिल दळवी, दिपक जाधव, प्रदिप गोळे, विवेक तेलंगे, शरद चोरघे, मिलिंद देशमुख, आल्पेश जाधव, नरेश भोईर, मंगेश पालांडे आदिंसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Web Title: #MarathaKrantiMorcha Pali and parli big response for bandh