#MarathaKrantiMorcha महाड व तळा तालुक्यात क़डकडीत बंद, म्हसळ्यात प्रतिसाद नाही

सुनील पाटकर
बुधवार, 25 जुलै 2018

महाड - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर मुंबईसह रायगड येथे सकल मराठा संघाकडून बंदची हाक देण्यात आली त्याला आज महाड व तळा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. महाड व तळा तालुक्यात क़डकडीत बंद पाळण्यात आल्याने येथील जमजीवन विस्कळीत झाले. म्हसळ्यात मात्र आज दैनंदिन व्यवहार सुरु होते.

आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड बंदची हाक देण्यात आली आहे. याला सर्व मराठा समाज बांधवानी उत्स्फूर्त प्रकिसाद दिला. शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून बाजागपेठ मार्गे मोर्चा काढण्यात आला. तालुक्यातील नाते, विन्हेरे, रायगड, वाळण, बिरवाडी, खाडीपट्टा या भागातून दुचाकीवरुन अनेक तरुण व ग्रानस्थ घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले. 

महाड शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. भाजी दुकाने, चहाच्या टप-याही बंद होत्या. शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहनेही बंद असल्याने पालकांची व मुलांची गैरसोय झाली. पतसंस्था व बँकेचे व्यवहारही मोर्चा काळात ठप्प झाले होते. त्यामुळे ग्राहकांना ताटकळत बसावे लागले. टमटम, रिक्षा वाहतूकही मंदावलेली होती. त्यामुळे म.गांधी मार्ग.छ.शिवाजी मार्ग तसेच चौकातील गजबजलेला भाग, व सर्व रस्त्यावर शुकशुकाट होता. मोर्चा काळात चोख पोलिस बंदाबस्त होता. महाड प्रमाणेच तळा तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळा बाजारपेठेतही शुकशुकाट होता. म्हसळ्यात बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही येथील बाजारपेठ व दुकाने सुरु होती.

Web Title: MarathaKrantiMorcha response to Maharashtra band in Mahad and Tala Taluka