

Students learning Marathi online in Israel
sakal
बांदा : इस्रायलमध्ये राहून मराठीचे धडे देणाऱ्या कोकण सुपुत्री असलेल्या इवा तळेगावकर यांच्यामुळे अनेक इस्रायली नागरिक आज मराठीशी जोडले गेले आहेत. भाषेचा अभिमान, संस्कृतीची ओढ आणि अध्यापनाची आवड यामुळे त्यांनी परदेशातही मराठीचा दीप खऱ्या अर्थाने प्रज्वलित केला आहे. तळेगावकर यांनी थेट इस्रायलमधून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.