स्वच्छ सुंदर देवरूखसाठी डीकॅडची कलाकुसर

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 13 डिसेंबर 2017

साडवली : देवरुख शहराची आणि संगमेश्वर तालुक्याची वेगळी ओळख कलेच्या माध्यमातून करुन दिली जाणार आहे. यासाठी देवरुख शहरातील भिंती आता बोलू लागणार आहेत. आपली लोककला या भिंती अधिक जीवंत करणार आहेत. या भिंतीमध्ये जिवंतपणा आणण्याचे काम डीकॅडचे विद्यार्थी करत आहेत.
देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँन्ड डिझाईन म्हणजेच डीकॅड कलामहाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांनी स्वच्छ सुंदर देवरुखसाठी भिंती बोलक्या करण्याची संकल्पना मांडली. या कल्पनेला उद्योजक बाळासाहेब पित्रे यांनी प्रोत्साहन दिले. यासाठी दीड लाखाची तरतुदही केली. या चांगल्या संकल्पनेला देवरुख नगरपंचायतीने सहकार्याचा हात पुढे केला. 

नगराध्यक्ष निलेश भुरवणे, उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये व सर्व नगरसेवकांनी या उपक्रमाला पाठींबा दिला. डीकॅडचे विद्यार्थी या भिंती बोलक्या करण्यासाठी आपले कलाकौशल्य पणाला लावून संगमेश्वर तालुक्यातील लोककला रेखाटु लागले आहेत. शहराच्या सौंदर्यात ही चित्रे अधिकच भर घालणार आहेत. मातृमंदिर ते शिवाजी चौक या परीसरातील भिंती सजीव होऊ लागल्या आहेत. 
या भिंतीवर वासुदेव, गोंधळी, नमन परंपरा, जाकडी नृत्य, गावकरी, प्रसिद्ध मंदिरे असे विविध प्रकार रेखाटण्यास सुरुवात झाली आहे. या भिंती सजताना व त्यात जिवंतपणा येताना पाहून शहरवासीय नकळत थांबून हा नजारा पाहून विद्यार्थी कलाकारांचे कौतुक करु लागले आहेत. हा सगळा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला आहे. या सजीव भिंती सेल्फी पाँइट होवू लागल्या आहेत. या भिंतीही संवाद साधू लागल्या आहेत. कुंचल्याची ताकद कीती असते याचा प्रत्यय नागरीक घेऊ लागले आहेत. 

Web Title: Marathi news devrukh walls painting