दरडीच्या कामामुळे "एक्‍स्प्रेसवेवर' रांगा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

खोपोली - द्रुतगती महामार्गावरील आडोशी ते खोपोली "एक्‍झिट'बरोबरच घाटातील रस्त्यावर ढिले झालेले कातळ व धोकादायक दरडी काढण्याच्या कामाला मंगळवारपासून सुरवात झाली; मात्र या कामाच्या काळात तासाभरानंतर प्रत्येकी 20 मिनिटे वाहतूक बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. 

आडोशी बोगद्यापासून घाटाकडील बाजूच्या कामाला आज सकाळी 9 पासून सुरवात झाली. सुरक्षितता म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी हैराण झाले होते. त्यातील बहुसंख्य प्रवाशांना वाहतुकीच्या नियोजनाची माहिती नव्हती. त्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आजच्या दरडी काढण्याच्या कामानंतरही आणखी धोकादायक दरडी असल्याचे निदर्शनास आल्यास अशाच पद्धतीने वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे, असे "आयआरबी'च्या सूत्रांनी सांगितले. या काळात वाहतूक सुरळीत राखण्यासाठी आयआरबी टीमबरोबरच महामार्ग वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते, असे महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक बबन आंधडे यांनी सांगितले.

Web Title: marathi news Express Way Ghat Road Luj Katal khopoli