डिजीटायझेशनच्या जमान्यात घेतले पत्रलेखनाचे धडे

LetterWriting
LetterWriting

पाली (रायगड) : डिजीटायझेशनच्या जमान्यात पत्र, पत्रलेखन, पोस्टाची तिकीटे अादिंबद्दल मुलांना फार अपुरी माहिती आहे. जनसंज्ञापनाच्या या महत्त्वाच्या पारंपारीक साधनांची तंत्रशुद्ध माहिती अापल्या विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी रायगड जिल्हा परिषद डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसेचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी शाळेतील सर्व मुलांना या सगळ्याची प्रत्यक्षात महिती दिली.

बुधवारी (ता. 14) राजिप डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसे शाळेत पहिली ते पाचवीच्या सर्व मुलांसाठी पत्रलेखन उपक्रम घेण्यात आला. यावेळी मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रांचे नमूने दाखवण्यात आले. त्यामध्ये अांतरदेशीय पत्र, पोस्ट कार्ड, पोस्ट पाकिट, मनिअाॅर्डर फाॅर्म, पैसे भरण्याची व काढण्याची पावती, स्पीडपोस्टची पावती अादिंचा समावेश होता. मुलांना फक्त पोस्टातून पत्र पाठवले जाते एवढेच माहित होते. परंतु आजच्या उपक्रमामुळे प्रत्यक्षात पत्र लेखन कसे करावे हे प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना समजले. पोस्टाची प्रक्रिया कशी चलते. सर्व प्रक्रिया स्पष्ट करुन सांगितल्या. असे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी सकाळला सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी खूप रंजक व जिज्ञासू प्रश्न विचारले. आपल्याला कुठे कुठे पत्र पाठवता येते? आता व्हॉट्सअॅप आहे. मग त्यासारखे मेसेज पोस्टातून जाऊ शकत नाही का? स्पीड पोस्ट म्हणजे काय? यावर दिलीप गावित व सहशिक्षीका सीमा सिरसट यांनी मुलांच्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे देऊन निरसन केले. देशामधे कुठेही कोणालाही पत्र पाठवू शकतो. स्पीड या शब्दाचा अर्थ समजून स्पष्टीकरण दिले. जलद गतीने जाणे हे सांगितले. पोस्टात पैसे कसे भरावेत व काढावेत हे सांगितले. तसेच पोस्ट ऑफिस मधील सर्व योजनांची व ई-मेल सर्विस पर्यंत संपूर्ण माहीती दिली. पोस्ट तिकीटांची व पत्रांच्या नमुन्यांची माहिती प्रत्यक्षात दिली. विद्यार्थ्यांनी विविध पत्रांचे नमुने व पोस्ट टिकिटे स्वतः हाताळून माहिती घेतली. सर्व मुलांनी एक एक पत्र लिहिले व आनंद व्यक्त केला. पत्र कसे लिहावे? मायना कसा लिहावा? याविषयी शिक्षिका सीमा सिरसट यांनी मार्गदर्शन केले.

उपक्रम सुुरु असताना केंद्रप्रमुख प्रकाश तायडे यांनी भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन सर्वांचे कौतूक केले. या उपक्रमाची माहीती गट शिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी यांना मिळाल्यावर त्यांनी मुख्याध्यापक, शिक्षीका व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

अाधुनिकतेच्या युगात विद्यार्थ्यांना या गोष्टीही समजणे व माहित होणे गरजेचे आहे. यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. मुलांनी खुप चांगला प्रतिसाद देत स्वतः पत्र लिहिले. या उपक्रमामुळे विद्यार्थी कोणाला पत्र लिहायचे? याविषयी स्वतः विचार करू लागले. विद्यार्थ्यांच्या मनात इतरांविषयी आदर निर्माण झाला. नवीन काहीतरी केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुढे विद्यार्थी म्हणाले सर आम्ही आमच्या सर्व नातेवाईकांना पत्र पाठवू. विद्यार्थी स्वतः आत्ता पोस्टात जाऊन पोस्टाचे काही व्यवहार करु शकतात हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला अाहे, असे राजिप डिजिटल व टॅबलेट शाळा धोंडसेचे मुख्याध्यापक दिलीप गावित यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com