ढगाळ, पावासाळी स्थितीत अशी घ्या आंबा व काजु पिकांची काळजी

अमित गवळे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : बंगालचा उपसागर व श्रीलंकेच्या दक्षिण भागाकडे चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उत्तरेकडील बाष्पयुक्त वातावरण दक्षिणेकडे खेचेल जात आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. अशा परिस्थितीत आंबा व काजुच्या झाडांवर रोग व किड पसरण्याचा धोका असल्याची माहिती डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगूर्ला यांच्यातर्फे देण्यात आली आहे. 

परिणामी रायगड जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांनी पिकांची काळजी व खबरदारी घेण्याचे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सकाळतर्फे केले आहे. या वातावरणामुळे कोकणातील रत्नागिरी, रायगड, मुंबई, सिंधुदूर्ग व मध्यमहाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच या ढगाळ हवामानाचा प्रभाव कदाचित तीन ते चार दिवस राहणार आहे. अशा परिस्थितीत आंबा पिकामध्ये तुडतुड्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच पाऊस पडल्यास आंब्या मोहरावर करपा रोग अाणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 

अशी घ्या आंब्याची काळजी -
तुडतूड्याच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झॉम 25 W.G. (03 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी) फवारणी सोबत करपा व भुरी रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझिम + मॅनकोझेब (साफ, सिफाई, कॅम्पनियम) हे तयार मिश्रण 20 ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यामधून फवारावे. तसेच ज्या आंबा बागेमध्ये पानगळ सुरु आहे अशा बागांमध्ये लालकोळी किडीचा प्रादुभ्राव असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सल्फर 80 W.G. (80 टक्के पाण्यात विरघळणारे पावडर) 20 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यामधून फवारावे.

अशी घ्या काजूची काळजी -
ढगाळ वातावरणात काजुवरील ढेकण्या (टि-मॉस्किटो) या किडिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी ज्या भागामध्ये पिक मोहरावर आहे अशा ठिकाणी प्रोफेनोफॉस 10 लिटर पाण्यात 10 मिली तर ज्या भागात काजू पिक फळधारणा अवस्थेत आहे अशा ठिकाणी लॅमडा सायहॅलोथ्रिन 6 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणत फवारावे. अशी माहिती डॉ. प्रदिप हळदवणेकर, सहयोगी संशोधन संचालक, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगूर्ले यांनी दिली आहे.

सध्या कोकण विभागात ढगाळ वातावरण असून हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तविली आहे. प्राप्त परिस्थितीतील ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता गृहित धरुन आंबा मोहरावर रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विदयापीठ, दापोली यांनी केलेल्या शिफारशीपैकी आंतरप्रवाही किटकनाशक, आंतरप्रवाही बुरशी नाशकाची एकत्रित फवारणी करावी, असे कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news kokan news mango cashew crop care in rain