बॉम्बस्फोटाचे मॉकड्रील सिंधुदुर्ग प्रशासनाच्या अंगाशी

शिवप्रसाद देसाई
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालयात मॉकड्रीलसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने आज केलेले स्फोट प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले. अचानक झालेले स्फोट आणि निर्माण झालेला धुराचा लोट यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चेंगराचेंगरी झाली. यात गरोदर महिला, महिला कर्मचारी यांचे हाल झाले. या चेंगराचेंगरीत एकजण जखमीही झाला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी अचानक एकापाठोपाठ एक असे तीन मोठे स्फोट झाले. याबरोबरच धुराचे लोट उसळले. आज विविध शासकीय कामांसाठी महिला मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. यात काही गरोदर महिलांचाही समावेश होता. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात महिला कर्मचार्‍यांची संख्या जास्त आहे. अचानक झालेल्या स्फोटामुळे जो तो जिवाच्या आकांताने इमारतीच्याखाली पळू लागला. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात एक अपंग व्यक्ती जखमी झाला. गरोदर महिलांचे खूप हाल झाले. उच्चदाब असलेल्या काहींना उपचार घेण्याची वेळ आली. मॉकड्रील असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्‍वास सोडला; मात्र अचानक घडलेला हा प्रकार प्रशासनाच्या चांगलाच अंगलट आला. यामुळे उडालेला गोंधळ निस्तारणे त्यांना कठीण बनले. स्वतः जिल्हाधिकारी उदय चौधरीही घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Marathi news kokan news mock drill