रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे "रोटरी युवक नेतृत्व पुरस्कार"

लक्ष्मण डुबे
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

रसायनी (रायगड) : रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने वासांबे मोहोपाडा येथील एचओसी कॉलनीतील श्री साईबाबा मंदिराच्या सभागृहात बुधवारी (ता. 14) "रोटरी युवक नेतृत्व पुरस्कार" शिबीर घेतण्यात आले. शिबीरात रसायनी परीसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. यात विशेष नैपुण्य दाखवलेल्या पवन अमित मिश्रा आणि पुजा दत्तात्रेय पाटील यांचा गौरव करण्यात आला.  

शिबीराचे उद्घाटन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा पारंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष दिपक चौधरी, सचिव गणेश काळे,  सदस्य नागेश कदम, सुनिल भोसले, गणेश वर्तक, बाळकृष्ण होनावळे, सुनील कुरूप आदी उपस्थित होते. प्रस्तावित बाळकृष्ण होनावळे यांनी केले. 

शिबीरात बन्शीधर सोमाणी यांनी योगा आणि योगाचे महत्व, कृष्णराव ओंकार यांनी यशस्वी जीवनाची सुत्रे, कर्नल प्रेमानंद यांनी लैंगिक शोषण, संजय चाळके यांनी रस्ते व सर्व साधारण सुरक्षा, कैलास मोरे यांनी सायबर गुन्हे, संजय सांगळे यांनी हस्तकला (वारली कला), दिवाकर पिल्ले यांनी नेतृत्व कसे आसावे या विषयी माहिती दिली. 

शिबीरात जनता विद्यालय मोहोपाडा, प्रिया स्कूल मोहोपाडा, महिला उद्योग मंडळ संचालित प्राथमिक शाळा पराडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुराडे, माध्यमिक विद्यालय चावणे, पारनेर महाराज विद्यालय वाशिवली, आदि सात शाळा इयत्ता आठवी, नववी आणि आकरावी मधील 450 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

Web Title: Marathi news kokan news rotary club of patalganga