संगमेश्वर तालुका क्रीडा संकुलासाठी पवार बंधुंनी दिली जमीन

प्रमोद हर्डीकर
बुधवार, 31 जानेवारी 2018

साडवली : 'तालुका तीथे क्रीडा संकुल' या शासनधोरणानुसार संगमेश्वर तालुक्याचे क्रीडा संकुल साडवली येथे उभे राहीले आहे. या क्रीडा संकुलासाठी कोसुंब येथील पवार बंधुंनी आपली 10 एकर जागा विनामोबदला प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाला दान म्हणून दिली. आजच्या युगात साधी एक इंच जागा अशीच कोण देत नाही मात्र पवार बंधुंनी ही जागा दान देऊन मनाचा मोठेपणा दाखवला आहे. 

ही मोठी त्यागाची गोष्ट आहे, अशा शब्दात पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पवारांचा गौरव केला. शाल श्रीफळ देऊन पवारांचा सन्मान केला. जिल्ह्यातील हे पहीलेच क्रीडा संकुल असून पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, चिपळुण-संगमेश्वरचे आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार सुभाष बने, तहसीलदार संदीप कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, तालुकाप्रमुख प्रमोद पवार, जि.प.,प.स.सदस्य, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, साडवली सरपंच सारीका भिंगार्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत आदी उपस्थित होते. या क्रीडासंकुलासाठी 1 कोटीचा निधी मंजूर झाला होता. चारशे मीटरचा रनिंग ट्रॅक, अत्याधुनिक व्यायामशाळा, सर्व खेळांची मैदाने, आता तालुकावासियांसाठी खुली झाली आहेत. इथे चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त करुन हे खेळाडू घडवण्यासाठी आपण शासनाकडून आवश्यक निधी मिळवून देवू असे अभिवचन दिले.

Web Title: Marathi news kokan news sports complex